शाळेचा इतिहास वा वाटचाल

स्वातंत्र्य मिळूनही समाज अंधश्रद्धा, अज्ञान, बेरोजगारी गरिबी अश्या समस्यात अडकलेला होता त्यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण हे जुन्या परदेशी मिशनरी धर्मगुरूंनी शोधिले होते. त्यासाठी त्यांनी खेडोपाडी शाळा काढण्याचे काम चालू केले. त्याचपैकी एक शाळा म्हणजे १९५५ साली स्थापन झालेली पि. जे. एस. शाळा, सुरेगाव.<

स्व. फा. सिकस्थ कोपरगाव तालुका सुरेगाव येथे जमीन विकत घेवून शाळा बांधण्याचे ठरविले. सुरवातीला टंचाईच्या दोन खोल्या बांधल्या स्व. पौलस गावाजी सोनावणे ह्या मुख्याध्यापकांनी लोकांच्या घरोघरी /वाड्यावस्त्यावर जाऊन विदयार्थी मिळवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील त्या काळात आपल्या शाळेची भेट घेतली शाळेची सुरुवात व प्रगती पाहून ते भारावून गेले.
त्यानंतर संस्थेने बोधक गुरुजी यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेत पाठीवले फा. सिकस्थ यांनी जर्मनितील त्यांचा मित्राला शाळा बांधण्यासाठीच्या मदतीसाठी पत्र पत्र पाठीवले त्यावेळी त्यांचा मदतीने दोन पक्या खोल्या बांधण्यात आल्या. तद्नंतर फादरांची बदली झाली.

फा. सिक्स्थ यांच्या नंतर फा. स्लॅपशिश हे शाळेचे मॅनेजर झाले. यांनी शाळेची भव्य अशी दुमजली इमारत बांधली नंतर दिवसेंदिवस शाळेची प्रगती विद्यार्थी संस्था वाढत होती. त्यामुळे तुकड्या वाढत होत्या. शिक्षकांच्या संस्थेत वाढ झाली. शिपाई व लिपिकाचे पद शाळेला मिळावे. विद्यार्थी वाढल्याने इमारत कमी पडू लागली दोन सत्रामध्ये शाळा भरत होती. त्यामुळे तत्कालनी बिषप मा. रा. रेव्ह. बिषप थॉमस भालेराव यांचय मदतीने मा. फा. फिलिप अँन्थोनी हे संचालक असल्याने 1993 साली सात खोल्यांचे काम पुर्ण केले. आजपर्यंत अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचा विकासात मोलाची भर घातली शाळेला कोपरगांव पंचायत समितीने ‘‘आदर्श शाळा’’ पुरस्कार प्रदान केला तर शाळेतील शिक्षक श्री. थोरात रामचंद्र महादु यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. श्री. अगुस्तीन मार्शल साळवे, श्री. स्तेफान कोळगे गुरुजी, श्री. बापु निकाळे, नी. नरहर जोशी इ. शिक्षकांनी शाळेच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.